Gym Tips: सावधान! जिमला जाणारे तरुण करतात 'या' गंभीर चुका, ज्यामुळे बॉडी बनत नाही

Sameer Amunekar

जिममध्ये तासन्तास वेळ घालवणे

बरेच तरुण जिममध्ये जास्त वेळ घालवणे म्हणजे जास्त फायदा असा समज करतात. पण अतिव्यायामामुळे स्नायूंना विश्रांती मिळत नाही आणि शरीरावर उलट ताण पडतो.

Gym Tips | Dainik Gomantak

योग्य आहाराकडे दुर्लक्ष

फक्त व्यायाम करून फायदा होत नाही. प्रथिने, चांगले कार्ब्स, हेल्दी फॅट्स, पाणी यांचा योग्य प्रमाणात आहार घेतल्याशिवाय स्नायू वाढत नाहीत.

Gym Tips | Dainik Gomantak

वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग टाळणे

व्यायाम सुरू करण्याआधी वॉर्मअप करणे आणि शेवटी स्ट्रेचिंग करणे गरजेचे असते. हे न केल्यास दुखापत होण्याचा धोका वाढतो.

Gym Tips | Dainik Gomantak

जास्त वजन उचलण्याची घाई

इतरांना बघून जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केल्यास पकड़ बिघडते, फॉर्म चुकीचा होतो व दुखापती होतात. वजन हळूहळू वाढवणे आवश्यक आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

एका भागाचा व्यायाम

बरेच जण फक्त छाती, बायसेप्स किंवा खांदे यांवर लक्ष केंद्रित करतात. पण शरीरात संतुलन राहण्यासाठी पूर्ण शरीराचा व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

Gym Tips | Dainik Gomantak

नीट झोप न घेणे

स्नायू वाढतात ते व्यायामाच्या वेळी नाही, तर झोपेत. जर झोप कमी असेल तर शरीराला पुनर्बांधणीची संधी मिळत नाही.

Gym Tips | Dainik Gomantak

फक्त सप्लिमेंटवर अवलंबून

बरेच तरुण प्रोटीन पावडर, प्री-वर्कआउट किंवा जास्त सप्लिमेंट्स घेतले की शरीर लगेच बनेल असा गैरसमज करतात. सप्लिमेंट फक्त ‘साहाय्यक’ असतो, मुख्य गोष्ट आहे आहार + नियमित व्यायाम + विश्रांती.

Gym Tips | Dainik Gomantak

केवळ 7 दिवसांत चेहरा होईल गोरा आणि चमकदार!

Face glow tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा