Manish Jadhav
फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामध्ये मुख्यतः खालील आजार समाविष्ट आहेत.
फास्ट फूडमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी, साखर, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.
ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियम (मीठ) जास्त असल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, ब्लड प्रेशर वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
जंक फूडमध्ये प्रक्रियायुक्त साखर आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स जास्त असल्याने टाइप-2 डायबेटिसचा धोका वाढतो.
फास्ट फूडमध्ये फायबरचा अभाव असल्याने पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी यासारख्या तक्रारी होऊ शकतात.
फास्ट फूडमधये कमी पोषणमूल्ये आणि अधिक शुगर-फॅट यामुळे थकवा, चिडचिड, तणाव आणि डिप्रेशन येऊ शकते.
जास्त फास्ट फूडमुळे फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते.
कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि प्रक्रियायुक्त पदार्थांमधील फॉस्फेट्समुळे हाडांची ताकद कमी होते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.