Manish Jadhav
प्रत्येकजण आपली त्वचा चमकदार आणि निरोगी कशी राहिल यासाठी अनेक घरगुती उपाय करत असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रुटिंग करतात.
अशातच तुम्हाला तुमची त्वचा नेहमीच तरुण आणि चमकदार राहावी असे वाटत असेल तर दररोज सकाळी आवळा चहा पिण्यास सुरुवात करा.
आवळा हा अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे, जो नैसर्गिक पद्धतीने कोलेजन वाढवण्यास मदत करतो.
आवळा चहासोबतच निरोगी आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हिरव्या भाज्या, काजू, आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने कोलेजनची पातळी समतोल राखली जाते.
आवळ्याचा चहा सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे.
जर तुम्हाला अॅसिडिटी किंवा कोणतीही अॅलर्जी नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याच्या चहाचा समावेश केला पाहिजे.