Sameer Panditrao
आपण अनेकदा चहासोबत किंवा भुकेवर उपाय म्हणून बिस्किट खातो. रोजच्या आहारात त्याचा वापर हानिकारक ठरू शकतो.
बिस्किटांमध्ये साखर भरपूर असते. त्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि दात खराब होण्याचा धोका संभवतो.
बिस्किटात ट्रान्स फॅटचा समावेश असतो. ट्रान्स फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
बिस्किटात पोषणमूल्य कमी असते. त्यामुळे जेवणाला पर्याय म्हणून कधीच खाऊ नका.
बिस्किटांमध्ये कृत्रिम रंग, फ्लेवर्स आणि संरक्षक द्रव्ये असतात जी शरीराला हानी पोहोचवू शकतात.
सतत पर्याय म्हणून खाल्ल्याने बिस्किटे खाणे एक व्यसन होऊ शकते, जे आरोग्यासाठी धोका ठरू शकते.
बिस्किटांऐवजी फळं, सुकामेवा, किंवा घरगुती पदार्थ खावा.