Akshata Chhatre
गरमीच्या दिवशी गोव्यात लोकं जातात ती फेणीच्या शोधात. फेणी हे काजूपासून बनवलं जाणारं पेय आहे, मात्र तुम्हाला माहितीये का या फेणीचे काही औषधी उपयोग सुद्धा आहे.
फेणी गोव्यात बनवलेले एक पारंपरिक मद्य आहे. हे काजू किंवा नारळाच्या रसापासून बनवतात.
असं म्हणतात की पोट खराब असल्यास जेवल्यानंतर थोडीशी फेणी घेतल्याने पचन सुधारायला मदत करू शकते. यामुळे पचन क्रिया चालवण्यास मदत मिळते.
थंडीच्या दिवसांत, फेणी शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा देते आणि म्हणून थंडीच्या दिवसांत थंडीवर मात करण्यासाठी फेणी महत्वाची.
पोट दुखी सारखे आजार असल्यास काही लोक फेणी अंगावर लावल्यास वेदना कमी होते असे म्हणतात.
फेणीमध्ये जंतुनाशक गुणधर्म आहे, त्यामुळे याचा वापर जखमा साफ करताना केला जाऊ शकतो.
मात्र कायम लक्षात ठेचा फेणीचा वापर कमी प्रमाणात करावा. जास्त प्रमाणात वापरल्यास नुकसान होऊ शकते. त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने फेणीचा वापर करावा.