Ganeshprasad Gogate
सध्याच्या काळात लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलत चालल्या आहे. वेळेचा अभाव, उलट सुलट खाणे, तळकट मसालेदार पदार्थांमुळे पचन तर बिघडतेच, शिवाय अनेक गंभीर आजार निर्माण होतात.
खाल्लेलं अन्नही लवकर पचत नाही. पोटाचे विकार आपल्याला छळू नये, यासाठी खाता- पिताना विशेष काळजी घायायला हवी.
जेवण करण्याच्या ३० मिनिटाआधी नेहमी पाणी प्या, उत्तम आरोग्यासाठी शरीर नेहमी हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पदार्थात आल्याचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि शरीरातील आजारही दूर होतात
आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते, शिवाय अन्नही लवकर पचते. आपण दही जेवण करताना किंवा जेवणानंतरही खाऊ शकता.
जेवल्यानंतर काहींना लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच टाळा. जेवल्यानंतर शतपावली करा, निदान १० ते १५ मिनिटं शतपावली करणं गरजेचं आहे. यामुळे अन्न पचण्यास मदत होते.