Ganeshprasad Gogate
उस्ताद रशिद खाँ यांचे गोव्याशी एक वेगळेच नाते होते. गोव्याबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षण होतं.
त्यांना इथेच घर बांधून स्थायिक व्हायचे होते. गोव्यात जागा बघण्यासाठी कोलकाताहून खास ते गोव्यात आले होते. इथला निसर्ग आणि शांतता त्यांना खूप मोहित करायची.
गेल्या वर्षीच्या 11व्या स्वरमंगेश समारोहात गाणं झाल्यानंतर फक्त घराला जागा बघण्यासाठी मुद्दाम ते गोव्यात दोन दिवस थांबले होते.
स्वरमंगेशच्या पहिल्या समारोहात उस्ताद रशिद खाँ यांनी दुपारच्या सत्रात राग शुद्ध सारंग गायले होते.
कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात त्यांचे ते गायन साक्षात सरस्वती भारत रत्न लता मंगेशकर समोर बसून ऐकत होत्या आणि त्यांना भरभरून दाद देत होत्या.
गेल्या 12 वर्षाच्या स्वरमंगेश समारोहात 10 वेळा त्यांना शास्त्रीय गायनासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या गायनशैलीचे वर्णन करणे कठीणच परंतु त्यांचे गाणे थेट हृदयाला भिडणारे असायचे.