ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम केल्यानं मणक्याचं दुखणं सुरु झालंय; फॉलो करा या सोप्या टिप्स...

Ganeshprasad Gogate

व्यायाम न करणाऱ्यांना मणक्याचा त्रास

दिवसाचे 8 ते 10 तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. यातही विशेषत: लठ्ठ व्यक्ती आणि व्यायाम न करणाऱ्यांना मणक्याचा त्रास जाणवू शकतो.

Back Pain | Dainik Gomantak

एकाच स्थितीत बसल्याने

सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता असते

Back Pain | Dainik Gomantak

सांध्यांवर ताण

व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पाठीत बाक काढून चालायची आणि बसायची सवय यामुळे मागच्या बाजूच्या सांध्यांवर ताण येतो. त्यामुळे बसताना शरीराची पोझिशन ताठ हवी, मानही ताठ असायला हवी.

Back Pain | Dainik Gomantak

पोझिशन योग्य हवी

लॅपटॉप किंवा टेबल आणि खुर्चीची पोझिशन योग्य असेल तर पाठदुखीची समस्या उद्भवत नाही. त्यामुळे आपली बसायची पद्धत योग्य आहे की नाही हे तपासावे.

Back Pain | Dainik Gomantak

चुकीच्या पद्धतीने बसू नये

बसताना चुकीच्या पद्धतीने बसू नये. बरेचदा कामाच्या नादात आपण तिरके, वाकडे बसतो. मात्र त्याने नंतर पाठ अवघडते. खुर्चीवर बसण्याची पद्धतही व्यवस्थित हवी.

Back Pain | Dainik Gomantak
Amala | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी