Ganeshprasad Gogate
एका नव्या सर्वेक्षणानुसार मध्यरात्री खाणे, अपूर्ण झोप आणि लठ्ठपणा यात दुवा असल्याचे दिसून आले. हा अभ्यास ऍरिझोना विद्यापीठात केला गेला.
यात असे दिसून आले की, ज्यांना रात्री झोप लागत नाही अशा लोकांना मध्यरात्री भूक लागते आणि अशा वेळी जंक फूड खाण्याकडे कल जास्ती असतो. हे असे धोकादायक खाण्यामुळे वजन आणि लठ्ठपणा वाढतो.
या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले की,अपूर्ण झोपेमुळे जंक फूड खाण्याची भूक वाढते आणि अशा धोकादायक आणि अवेळी खाण्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि असे अजून शारिरीक आजार निर्माण होतात.
शास्त्रज्ञांच्या मते, झोपचा देखील आपल्या चयापचयवर कशा प्रकारे प्रभाव पडतो हे दर्शविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे.
जर का तुम्हाला वेळेवर झोप लागत नसेल, तर मोबाईल, टीव्ही, संगणक, लॅपटॉप यासारख्या स्क्रिन्सपासून झोपण्यापूर्वी किमान एक तास लांब राहावे. अशा स्क्रीन्स मधून येणाऱ्या किरणांमुळे झोप लागत नाही.