उच्च रक्तदाब कधी बळावतो? जाणून घ्या या निरीक्षणांवरून..

Ganeshprasad Gogate

अति मानसिक ताण-

जीवनात ताण हा असतोच पण काही वेळेला एखाद्या गोष्टीने येणारा आता मानसिक ताण हा उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरतो. ताण येण्याचे प्रसंग जर वारंवार तुमच्या आयुष्यात येत असतील तर वेळीच सावध व्हा.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

आनुवंशिकता-

डायबेटीस, स्थूलता यासारखे काही आजार हे आनुवंशिकतेने पुढील पिढीकडे येत असतात. त्याच गटातील उच्च रक्तदाब हाही एक आजार आहे. परंतु त्यावर आहारविहाराचा समतोल साधत आपण नियंत्रण ठेऊ शकतो.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

जंक फूड-

जर तुमच्या दैनंदिन आहारात जंक फूड/फास्ट फूडचा समावेश असेल तर त्याला वेळीच आवर घाला. कारण अतिखारवलेले, अतितेलकट पदार्थ रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरतात. असे पदार्थ शक्यतो टाळावेत.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

मिठाचे प्रमाण

तुम्ही आहारात मिठाचे प्रमाण किती ठेवता यावरही तुम्ही किती निरोगी आहात हे समजू शकते. कारण आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे हे रक्तदाब वाढण्यासाठी महत्वाचे कारण आहे.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

व्यायामाचा अभाव-

आपण जसं जेवतो, खातो, कामं करतो त्याच प्रमाणे व्यायाम किती करतो हे प्रत्येकाने पाहणे गरजेचे आहे. व्यायाम म्हणजे फक्त चालणे नव्हे तर योगासनं करणं, प्राणायाम करणं सुद्धा महत्वाचं आहे. शरीरात साठलेली चरबी, साखर व्यायामामुळे जाळली जाते.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा-

आपल्या जशा कामाच्या वेळा आखलेल्या असतात तशाच खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. वेळेवर जेवणं करणं आणि वेळेवर झोप घेणं यामुळे निम्मे आजार कमी होतात.

Causes of high blood pressure | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart Watch | Dainik Gomantak