गोमन्तक डिजिटल टीम
उकडीच्या मोदकांची लगबल
उद्या बाप्पा येतील म्हणजे घरात उकडीच्या मोदकांची लगबल सुरु झालीच असेल. तांदळाच्या उकडीपासून बनलेले हे मोदक साजूक तुपासोबत चविष्ट लागतात मात्र यात काही जीवनावश्यक मूल्ये देखील दडलेली आहेत.
शरीराला विविध प्रकारे मदत
तांदळाची उकड, गूळ, खोबरं आणि वेलची घालून मोदक बनवला जातो आणि वर सोडलेल्या तुपाच्या धारेमुळे शरीराला विविध प्रकारे मदत मिळते.
गुळाचे महत्व
आजकाल लोकं साखरेपेक्षा गुळाला महत्व देतात. गुळात लोह म्हणजेच Iron असल्याने शरीराला पोषण मिळायला मदत होते.
तांदळाच्या पिठाचे गुण
उकडीच्या मोदकांमध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो आणि यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात.
वेलचीचा खमंग वास
मोदकांच्या सारणात वेलचीच्या वापरामुळे मोदकांना खमंग वास तर येतोच पण त्यासोबत शरीरात उष्णतेचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
उकडीचे मोदक आणि साजूक तूप
उकडीचा मोदक हा साजूक तुपाशिवाय अपूर्ण आहे. तुपामुळे मेटॅबॉलिझम वाढायला मदत होते, सोबतच यामुळे त्वचा उजळून निघते.
आरोग्यवर्धक
पावसाळ्यात विविध प्रकारची रोगराई वाढत असते आणि या सर्व जीवनावश्यक घटकांच्या सेवनामुळे शरीर सुधृढ बनतं.
गोड पर्याय
उकडीचे मोदक हे तांदळाचे पीठ उकडून बनवले जातात आणि म्हणूनच तेलापासून दूर राहू पाहणाऱ्यांची हा उत्तम पर्याय ठरतो.