Manish Jadhav
गोव्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनाला भुरळ घालते.
गोव्यातील अभयारण्ये साद घालतात. यातच आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून म्हादेई वन्यजीव अभयारण्याविषयी जाणून घेणार आहोत...
म्हादेई वन्यजीव अभयारण्य सुमारे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले आहे.
1999 मध्ये स्थापन झालेल्या या अभयारण्याला म्हादेई नदीचे नाव देण्यात आले आहे.
म्हादेई वन्यजीव अभयारण्य सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या असंख्य प्रजातींना आश्रय देणाऱ्या समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
255 हून अधिक प्रजातींची नोंद असलेले म्हादेई अभयारण्य आहे. कबूतर, मलबार पॅराकीट, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि ग्रे-हेडेड बुलबुल यासारखे पक्षी या अभयारण्यात आढळतात.