Manish Jadhav
सामान्यतः पिवळी केळी आपण नेहमीच खातो, पण लाल केळी ही आरोग्यासाठी अधिक पोषक आणि फायदेशीर मानली जातात. लाल केळीमध्ये पिवळ्या केळीच्या तुलनेत अधिक प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी असते.
लाल केळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.
या केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पोटॅशियममुळे हृदयाचे ठोके नियमित राहतात आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
लाल केळी फायबरचा उत्तम स्रोत आहेत. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचनक्रिया सुरळीत चालते. ज्यांना गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही केळी गुणकारी आहेत.
लाल केळीमध्ये बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीनसारखे अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक डोळ्यांचे रक्षण करतात आणि वाढत्या वयानुसार येणारा दृष्टीदोष रोखण्यास मदत करतात.
लाल केळीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. हे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
या केळीमध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज, सुक्रोज आणि ग्लुकोज) असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते. म्हणूनच खेळाडू किंवा जिम करणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम फळ आहे.
लाल केळीमध्ये व्हिटॅमिन बी6 असते, जे शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते. ज्यांना रक्ताल्पता किंवा ॲनिमियाचा त्रास आहे, त्यांनी लाल केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.