Manish Jadhav
दूधाला आपल्या आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ मानला जातो. रोजच्या आहारात आपण दूधाचे सेवन करतो.
दूधामध्ये आवश्यक पोषक तत्वे असल्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणून देखील संबोधले जाते.
दूध आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे असून दूधापासून तयार केले जाणारे पदार्थ जसे की, दही, तूप, लोणी, पनीर असे पदार्थ शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. तसेच, दूधाची साय देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दूधाच्या सायीमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे संपूर्ण आरोग्याला फायदे देतात. त्यात ए, डी आणि ई सारखी जीवनसत्त्वे असतात.
दूधाच्या सायीमध्ये फॅट्सचे जास्त प्रमाण असते. परंतु हे चांगले फॅट्स असते. साय वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याशिवाय, त्वचा तजेलदार ठेवण्यासाठीही साय फायदेशीर ठरते.
सायीत कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते.
मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी चांगल्या फॅट्सची आवश्यकता असते आणि साय अशा फॅट्सचा नैसर्गिक स्रोत आहे.
कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांचा साय देखील एक उत्तम स्रोत आहे.