Manish Jadhav
द्राक्षे हे सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. द्राक्ष खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
लाल, काळी आणि हिरवी द्राक्षं बाजारात सहज मिळतात. आज (17 मे) या वेबस्टोरीच्या माध्यमातून हिरव्या द्राक्षांच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत.
हिरव्या रंगाच्या द्राक्षांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते, जे पचनसंस्था सुधारण्यासह मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
हिरव्या रंगाची द्राक्ष कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. यासह रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते.
हिरव्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने जे त्वचेला चिरतरुण आणि तेजस्वी ठेवण्यास फायदेशीर ठरतात.
हिरव्या द्राक्षांमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.