Manish Jadhav
अक्रोडमध्ये 'ओमेगा-3 फॅटी ॲसिड' मुबलक प्रमाणात असते. सलग 14 दिवस अक्रोड खाल्ल्याने एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यास मदत होते.
अक्रोडमधील पोषक घटक रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
अक्रोडमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे नियमित सेवन केल्याने पोटातील फायदेशीर बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
14 दिवस नियमित अक्रोड खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. टाईप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास हे अत्यंत मदतशीर ठरते.
अक्रोड खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले वाटते. यामुळे वारंवार लागणारी भूक कमी होते आणि नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत मिळते.
अक्रोडमध्ये व्हिटॅमिन-ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. 14 दिवसांत तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणि केसांच्या मजबुतीत फरक जाणवू लागेल.
अक्रोडमध्ये असलेल्या मेलेनिन आणि ओमेगा-3 मुळे मेंदूतील आनंदी हार्मोन्स वाढतात. यामुळे मानसिक ताण कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.
अक्रोडमध्ये 'अल्फा-लिनोलेनिक ॲसिड' असते, जे हाडांना कॅल्शियम शोषण्यास मदत करते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते.