Manish Jadhav
पावसाळ्यात इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त असतो. ब्लॅक कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
पावसाळ्यात पचनसंस्था मंदावते आणि आळस वाढतो. ब्लॅक कॉफी पिण्यामुळे मेटाबॉलिझम वाढून कॅलरीज वेगाने बर्न होतात.
दमट आणि ढगाळ हवामानामुळे सतत आळस आणि सुस्ती जाणवते. ब्लॅक कॉफीमधील कॅफिन शरीराला त्वरित ऊर्जा देऊन ताजेतवाने ठेवते.
पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. गरम ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीराला आतून उबदारपणा आणि आराम मिळतो.
पावसाळ्यात पोट खराब होणे किंवा अपचनाच्या समस्या उद्भवतात. साखरेशिवाय ब्लॅक कॉफी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहते.
पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे मूड स्विंग्स आणि नैराश्य जाणवू शकते. ब्लॅक कॉफी मेंदूतील डोपामाइन वाढवून मूड फ्रेश ठेवते.
पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती असते. ब्लॅक कॉफी फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देऊन वजन नियंत्रणात ठेवते.