Manish Jadhav
उन्हाळ्यात द्राक्ष हे सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे. द्राक्ष दिसायला जरी लहान असले तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
तुम्ही लाल, काळ्या किंवा हिरव्या रंगाचे द्राक्ष पाहिले असतील आणि तुम्ही सर्व खाल्लीही असतील. प्रत्येक जातीच्या आणि रंगाच्या द्राक्षांमध्ये वेगवेगळे पोषक घटक आढळतात.
आज (6 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून काळ्या रंगाची द्राक्ष आपल्या किती फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत.
काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा तरुण राहते.
काळे द्राक्ष स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.
काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पॉलीफेनॉल शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
काळ्या रंगाच्या द्राक्षांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हाडे बळकट आणि मजबूत होण्यास मदत होते.
काळ्या रंगाच्या द्राक्षमध्ये मोठ्याप्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स आणि हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर घटक असतात.