Sameer Panditrao
अनेकांना वाटते की १ रुपयाची नोट बंद झाली आहे.
भारताची पहिली १ रुपयाची नोट ३० नोव्हेंबर १९१७ रोजी जारी करण्यात आली होती.
१ रुपयाची नोट रिझर्व्ह बँक नव्हे तर भारत सरकार जारी करते.
छपाई खर्च आणि कमी वापरामुळे तिचे उत्पादन मर्यादित प्रमाणात केले जाते, म्हणून ती बाजारात क्वचितच दिसते.
१९९४ मध्ये काही काळासाठी तिची छपाई थांबवण्यात आले, मात्र २०१५ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली.
नवीन १ रुपयाच्या नोटेवर सागर दीपगृहाचे चित्र आहे. तसेच ‘भारत सरकार’ असा स्पष्ट उल्लेख दिसतो.
१ रुपयाची नोट कधीच बंद झाली नाही! ती आजही वैध आहे.