Harry Brook Century: हॅरी ब्रूकची शतकी खेळी! रोहित-गिलच्या शतकांशी केली बरोबरी

Manish Jadhav

हॅरी ब्रूक

ओव्हल कसोटीच्या (Oval Test) पाचव्या सामन्यात भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विशेषतः हॅरी ब्रूकने केलेल्या फलंदाजीमुळे इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचला.

Harry Brook Century | Dainik Gomantak

विक्रमी शतक

हॅरी ब्रूकने अवघ्या 91 चेंडूंमध्ये शतक झळकावत, भारताला मोठा धक्का दिला. हे इंग्लंडच्या फलंदाजांने भारताविरुद्ध झळकावलेले तिसरे सर्वात वेगवान कसोटी शतक ठरले.

Harry Brook Century | Dainik Gomantak

रोहित-गिलशी केली बरोबरी

या शतकासह ब्रूकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 9 शतके पूर्ण केली. त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

Harry Brook Century | Dainik Gomantak

धमाकेदार खेळी

ब्रूकने 98 चेंडूत 111 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यात 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. आकाश दीपने (Akash Deep) त्याला आऊट केले.

Harry Brook Century | Dainik Gomantak

कारकिर्द

हॅरी ब्रूकने 2012 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो इंग्लंडच्या फलंदाजीचा महत्त्वाचा भाग बनला.

Harry Brook Century | Dainik Gomantak

10 शतके आणि 13 अर्धशतके

त्याने आजपर्यंत एकूण 30 कसोटी सामन्यांमध्ये 2820 धावा केल्या आहेत. यात 10 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

Harry Brook Century | Dainik Gomantak

इतर फलंदाजांची कामगिरी

ब्रूकशिवाय, बेन डकेटने 54 आणि अनुभवी फलंदाज जो रुटनेही शतकी खेळी खेळली. यामुळे इंग्लंडने सामन्यावर पकड मजबूत केली.

Harry Brook Century | Dainik Gomantak

भारतीय गोलंदाज हतबल

हॅरी ब्रूकच्या आक्रमक फलंदाजीमुळे भारतीय गोलंदाज हतबल झाले. एका क्षणी मजबूत स्थितीत असलेला भारत आता बॅकफूटवर गेला.

Harry Brook Century | Dainik Gomantak

Kolaba Fort: छत्रपतींच्या आरमाराचं केंद्र...! मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास सांगणारा 'कुलाबा किल्ला'

आणखी बघा