Manish Jadhav
भारत-इंग्लंड तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 82 चेंडूत शानदार शतक झळकावले. तिच्या वनडे कारकिर्दीतील हे सातवे शतक आहे.
हरमनने या शानदार शतकाच्या जोरावर वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत मिताली राजची बरोबरी केली. दोघींच्या नावावर प्रत्येकी 7 शतके आहेत.
मिताली राजने 211 डावांमध्ये 7 शतके केली होती, तर हरमनप्रीतने केवळ 129 डावांमध्ये हा पराक्रम केला, जे तिच्या वेगाचे द्योतक आहे.
हरमनप्रीतने 82 चेंडूत केलेले शतक हे भारतीय महिला क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक आहे. स्मृती मंधानाच्या (70 चेंडू) नावावर सर्वात जलद शतकाचा विक्रम आहे.
या शतकी खेळीदरम्यान हरमनप्रीतने वनडे क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला, जी तिच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठी कामगिरी आहे.
हरमनप्रीत ही वनडेमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी तिसरी भारतीय महिला क्रिकेटर बनली आहे. तिच्या आधी मिताली राज आणि स्मृती मंधानाने ही कामगिरी केली आहे.
4000 वनडे धावांचा टप्पा पार करणारी हरमनप्रीत कौर जगातील 17वी महिला क्रिकेटपटू ठरली.
स्मृती मंधाना (11 शतके) अव्वल स्थानी असून, हरमनप्रीत कौर आणि मिताली राज (प्रत्येकी 7 शतके) दुसऱ्या स्थानावर आहेत. पूनम राऊत (3 शतके) आणि थिरुश कामिनी (2 शतके) यांच्यानंतर आहेत.