Pranali Kodre
भारत विरुद्ध इंग्लंड या महिला संघात 6 डिसेंबरला टी20 मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडला, ज्यात इंग्लंडने ३८ धावांनी विजय मिळवला.
हा सामना भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी विश्वविक्रमी ठरला.
हा तिचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 101 वा सामना होता. त्यामुळे तिने ऑस्ट्रेलियाची दिग्गज कर्णधार मेग लेनिंगला मागे टाकले.
मेग लेनिंगने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची शारलॉट एडवर्ड आहे. तिने 93 सामन्यांत नेतृत्व केले आहे.
चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या श्रीलंका महिला संघाची कर्णधार चामरी अटापट्टू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच आहेत. त्यांनी प्रत्येकी ७६ आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नेतृत्व केले आहे.
पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजची मेरीसा अगुइलेरा असून तिने 73 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत कर्णधारपद भूषवले आहे.
इंग्लंडची कर्णधार हिदर नाईट, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि इंग्लंडचा माजी कर्णधार ओएन मॉर्गन या यादीत संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहेत. या तिघांनीही प्रत्येकी 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नेतृत्व केले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सातव्या क्रमांकावर असून त्याने 71 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत नेतृत्व केले होते.