Manish Jadhav
हार्ले-डेव्हिडसन इंडियाने नवीन प्रीमियम क्रूझर बाईक 2025 स्ट्रीट बॉब लॉन्च केली. ही बाईक जुन्या मॉडेलपेक्षा अधिक दमदार इंजिन आणि नवीन फीचर्ससह आली आहे. या शानदार बाईकची किंमत 18.77 लाख एवढी आहे.
या बाईकमध्ये आता 1,923cc चे नवे 117CI V-ट्विन एअर आणि लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे जुन्या 107CI इंजिनची जागा घेते.
नवीन इंजिनमुळे बाईकचा परफॉर्मन्स वाढला आहे. हे इंजिन 5,020 rpm वर 90 bhp पॉवर आणि 2,750 rpm वर 156 Nm टॉर्क जनरेट करते.
सुरक्षितता आणि रायडिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी यामध्ये तीन रायडिंग मोड्स (स्पोर्ट, रोड, रेन), ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस आणि क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स आहेत.
नवीन मॉडेलमध्येही बाईकचा मूळ क्लासिक लूक आणि लो-स्टांस कायम ठेवण्यात आला आहे. गोल हेडलॅम्प, झुकीव सस्पेन्शन आणि मिनी-एप हँगर हँडलबारमुळे तिला आकर्षक क्रूझर लूक मिळाला आहे.
जुने टू-इन-टू ब्लॅक फिनिश एक्झॉस्ट बदलून आता यामध्ये नवीन टू-इन-वन लाँगटेल एक्झॉस्ट पाईप देण्यात आला आहे.
बाईकमध्ये ड्रायव्हरसाठी सेमी-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, ज्यामध्ये डिजिटल रीडआउट देखील समाविष्ट आहे.
117CI इंजिन असणाऱ्या हार्ले बाइक्सच्या रेंजमधील ही सर्वात हलकी आणि रायडिंगसाठी सोपी बाईक आहे.