Manish Jadhav
आशिया कप 2025 मध्ये रविवारी (14 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या सामन्यात दोन झेल घेत हार्दिक पांड्याने T20 मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत किंग कोहलीला मागे सोडले.
56 झेलसह हार्दिक पांड्या आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. सर्वाधिक 65 झेल रोहित शर्माच्या नावावर आहेत, तर 57 झेलसह एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे.
हार्दिकने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर सॅम अयुबचा महत्त्वाची विकेट घेतली.
गोलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही हार्दिकने कमाल दाखवली. त्याने मोहम्मद हारिस आणि साहिबजादा फरहान यांचे झेल घेतले.
आशिया कपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात युएईला 9 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केले.
या सलग दोन विजयांमुळे भारतीय संघाचा सुपर-4 मधील प्रवेश निश्चित झाला आहे. आता त्यांचा पुढील सामना 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होणार आहे.