Manish Jadhav
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जात असली, तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास दुष्परिणामही होऊ शकतात. चला तर मग या वेबस्टोरीच्या माध्यमातून या दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊया...
ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे घटक असतात, जे पोटात ॲसिडचे प्रमाण वाढवू शकतात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि मळमळ अशा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होते. यामुळे हाडे ठिसूळ होण्याची आणि कमकुवत होण्याची शक्यता वाढते. विशेषतः महिलांसाठी हा एक गंभीर धोका असू शकतो.
ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असले तरी, ते असते. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे झोप न येणे, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा येऊ शकतो.
ग्रीन टीच्या अतिसेवनाने शरीरातील लोहाचे शोषण थांबते. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता (ॲनिमिया) निर्माण होऊ शकते. ज्या व्यक्तींना आधीच रक्ताची कमतरता आहे, त्यांनी ग्रीन टीचे सेवन जपून करावे.
ग्रीन टीमधील कॅफिनमुळे हृदयाचे ठोके अनियमित किंवा जलद होऊ शकतात. ज्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे टाळावे.
काही व्यक्तींना ग्रीन टीमधील कॅफिनमुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अचानक जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे सुरु केल्यास हा त्रास होण्याची शक्यता असते.
जास्त ग्रीन टी प्यायल्यास मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वे आणि खनिजे (Minerals) बाहेर पडतात. यामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.