Sameer Panditrao
प्रसिद्ध खेळाडूने भारताचे कोच गंभीर आणि आगरकर यांवर टीका केली आहे.
स्वत: काही साध्य न केलेल्या व क्षमता नसलेल्या व्यक्ती रोहित व कोहली यांसारख्या क्रिकेटपटूंचे भवितव्य ठरवणार याला दुर्दैव म्हणावे लागणार आहे; असे तो म्हणाला.
हा खेळाडू भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आहे.
हरभजन सिंग पुढे म्हणाला, की रोहित शर्मा व विराट कोहली या दोनही खेळाडूंच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू आहे. हे माझ्या समजण्यापलीकडील आहे.
हरभजन सिंग याने विराट कोहलीचे कौतुक करताना म्हटले, की विराट कोहली मैदानावर उतरल्यानंतर आजही अव्वल दर्जाचा खेळ करीत आहे. हे पाहून आनंद गगनात मावेनासा होतो.
तो म्हणाला, की दोघेही भारतीय संघातील महान खेळाडू आहेत. दोघांनीही फलंदाज म्हणून ठसा उमटवला आहे. दोघांकडेही दांडगा अनुभव आहे.
दोघांकडूनही युवा खेळाडूंना सातत्याने प्रेरणा मिळत आहे. दोघेही युवा खेळाडूंसमोर आदर्श निर्माण करीत आहेत.