Sameer Amunekar
एकटे असतानाही कंटाळा न येता स्वतःची साथ आवडत असेल, तर तो आनंदाचा मोठा संकेत आहे.
कोणावर अवलंबून न राहता करिअर, प्रवास, जीवनशैलीबाबत निर्णय घेऊ शकत असाल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या समाधानी आहात.
नात्यांचा ताण, अपेक्षा किंवा जबाबदाऱ्यांचा दबाव नसल्यामुळे मन शांत असेल, तर तो खरा आनंद आहे.
स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ आणि ऊर्जा देता येत असेल, तर अविवाहित जीवन तुमच्यासाठी सकारात्मक आहे.
प्रेम, आधार आणि संवाद इथे मिळत असेल तर ‘एकटे’ असूनही तुम्ही एकाकी नाही.
‘लग्न कधी करणार?’ या प्रश्नांचा तुमच्या आनंदावर परिणाम होत नसेल, तर तुम्ही खूप मजबूत आहात.
स्वतःची काळजी घेणं, स्वतःचा सन्मान राखणं आणि स्वतःवर विश्वास असणं हे खऱ्या आनंदाचं लक्षण आहे.