गोमन्तक डिजिटल टीम
वरुणराजाने उघडीप दिल्याने सध्या विविध भागांत बळीराजाने भातशेती कापणी आणि मळणीच्या कामास प्रारंभ केला आहे.
बहुतेक सर्वच भागांतील भातकापणी आणि मळणीची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.
पावसानेही उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली असून मळणीची कामे पूर्ण झाल्याने शेतकरी भातपिकाला वारे देताना दिसत आहेत.
यंदा भातपीक काहीसे लांबणीवर पडले आहे. मध्यंतरी ऐन दिवाळीच्या सुरुवातीला पावसाने धुमाकूळ घातला होता.
यंदा असंतुलित पाऊस पडूनही भातपीक समाधानकारक आहे.
भाताची कणसे धरण्याच्या प्रक्रियेवेळी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे भरड शेती पिकावर थोडासा परिणाम झाला आहे.
भातपीक घरात पडेपर्यंत पावसाने उसंत द्यावी, जेणेकरून कापणी-मळणी निर्विघ्नपणे होईल, असे शेतकरी म्हणत आहेत.