गोमन्तक डिजिटल टीम
नयनरम्य दूधसागर धबधबा आपले रूप पाहण्यासाठी पर्यटकांना खुणावतोय.
नुकताच पर्यटन हंगाम सुरु झालेला आहे.
कुळे गावापासून १२ कि.मी अंतरावर अभयारण्यात नयनरम्य असा फेसाळणारा दूधसागर धबधबा आहे.
दूधसागर नदी पार केल्यानंतर वन खात्याची प्रवेश गेट ओलांडताच अभयारण्य सुरू होते.
१९८९ पासून मोजक्याच जीप पर्यटकांना घेऊन दूधसागर धबधब्याकडे जात असायच्या
आज एकूण ४३१ जीप गाड्या कुळेत कार्यरत आहेत. उन्हाळ्यापर्यंत हा पर्यटन मौसम चालतो.
पावसाळ्यात दूधसागर नदीला महापूर येतो, त्यामुळे जीप गाड्यांवर निर्बंध येतात.