Sameer Amunekar
दिवसाची सुरुवात मोबाइलशिवाय करा. त्याऐवजी ५-१० मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा फक्त शांत बसून स्वतःसोबत वेळ घालवा. यामुळे मन प्रसन्न राहते.
जेवताना पूर्ण लक्ष त्या जेवणावर केंद्रित ठेवा. चव, सुगंध आणि पोषण याचा आनंद घ्या. हे ‘माइंडफुल ईटिंग’ आरोग्यासोबतच समाधानही देते.
पार्कमध्ये, टेरेसवर किंवा घराभोवती चालणे ही छोटी सवय तुम्हाला ताजेतवाने करते आणि मानसिक तणाव दूर करते.
प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिका. ती एक नवीन मराठी शब्द, इंग्रजी वाक्य, माहितीचा तुकडा किंवा छोटासा स्किल असो मेंदूला सक्रिय ठेवते आणि आत्मविश्वास वाढतो.
या दोन शब्दांनी नातेसंबंध बळकट होतात. तुमच्या नम्रतेमुळे लोक तुमच्याशी अधिक जोडले जातात.
दिवसात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि त्यासाठी मनापासून आभार माना. यामुळे सकारात्मकता वाढते आणि शांत झोप मिळते.
दररोज ५ मिनिटं डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. ही लहानशी मेडिटेशन सवय तुमचा तणाव नक्कीच कमी करेल.