Ashutosh Masgaunde
आज हॅरी ब्रूकचा 25 वा वाढदिवस आहे. इंग्लंडच्या युवा फलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने ओळख मिळवली आहे.
ब्रूकने आतापर्यंत इंग्लंडसाठी बारा कसोटी सामने, पंधरा एकदिवसीय सामने आणि २९ टी-२० सामने खेळले आहेत. या युवा फलंदाजाला अनेक क्रिकेटतज्ज्ञ इंग्लंडचे भविष्य मानतात.
ब्रूकने 2022 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध T20I सामन्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तेव्हापासून त्याने इंग्लंडसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
हॅरी ब्रूक हा काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे जो T20I आणि कसोटी दोन्हीमध्ये सातत्याने धावा करू शकतो. 91 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फक्त 12 कसोटी सामन्यांमध्ये 1181 धावा करत, त्याने दाखवून दिले आहे की तो गेम चेंजर आहे.
ब्रूकचा टी 20 क्रिकेटमध्ये 145 इतका स्ट्राइक रेट आहे. त्याने T20I क्रिकेटमधील 20 डावांमध्ये 544 धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये, ब्रूक हा दुर्मिळ खेळाडूंपैकी एक आहे जो 90 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये, त्याने आतापर्यंत चार शतके आणि सात अर्धशतके केली आहेत.
ब्रूक आयपीएल 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा भाग होता परंतु फ्रँचायझीने त्याला अलीकडे करारमुक्त केले. हैदराबादने ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.