Manish Jadhav
एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायल गाझा आणि इराणवर सातत्याने हल्ले करत आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
गाझामध्ये सरकार चालवणाऱ्या हमासच्या एका उच्च राजकीय अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हमास इस्रायलसोबत पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी युद्धविराम करण्यास तयार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान हमासच्या पॉलिटीकल विंगचे नेते खलील अल-हया यांचे हे वक्तव्य आले आहे.
एपीला दिलेल्या मुलाखतीत खलील अल-हया यांचे हे वक्तव्य पॅलेस्टिनी भूमीतून इस्रायलला हाकलून देण्याची हमासची वचनबद्धता दर्शवते.
इस्रायल हया यांच्या वक्तव्यावर विचार करेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे.
हमास देखील टू-स्टेट फॉर्म्युल्याच्या विरोधात आहे. संपूर्ण भूमीवर पॅलेस्टिनी राज्य स्थापन करुन इस्रायलच्या समूळ उच्चाटनाची भाषा हमास बोलतो.
अल-हया म्हणाले की, हमास गाझा आणि वेस्ट बँकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी फतह गटाच्या नेतृत्वाखालील पीएलओ (पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होण्यास तयार आहे.