Akshata Chhatre
कांद्याचा रस, मध, मीठ आणि फिल्टर पाणी यांच्या मिश्रणाने हे प्रभावी हेअर ग्रोथ सीरम तयार केले जाते.
कांदा किसून त्याचा रस काढा. त्यात समप्रमाणात पाणी आणि मध मिसळा. शेवटी चिमूटभर मीठ घालून मिश्रण तयार करा.
हे मिश्रण एका हवाबंद डब्यात ३ दिवस ठेवा. फर्मेंटेड रस केसांच्या मुळांना अधिक खोलवर पोषण देतो.
कांद्याच्या रसातील सल्फर केसांचे तुटणे थांबवते आणि पातळ होत असलेल्या केसांना पुन्हा मजबुती देते.
केस धुण्यापूर्वी २ तास आधी हे सीरम केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर सौम्य (Gentle) शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.
या सीरममधील अँटी-ऑक्सिडंट्स केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखतात आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवतात.
कांद्याचा रस थेट लावल्याने काहींना खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे वापरण्यापूर्वी कानामागे पॅच टेस्ट करणे विसरू नका.