Sameer Amunekar
2 टेबलस्पून नारळाचे दूध, 1 टेबलस्पून मध, 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर घ्या.
सर्व घटक एका पातेल्यात घालून मंद आचेवर 2-3 मिनिटे गरम करा, जाडसर पेस्ट तयार होईपर्यंत.
मिश्रण कोमट झाल्यावर केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा.
केस गाठविरहित ठेवण्यासाठी रुंद दातांचा कंगवा वापरा. त्यामुळे मास्क प्रत्येक केसावर समान पसरतो.
केसांना शॉवर कॅप लावा आणि 30 मिनिटे तसेच ठेवा.
कोमट पाण्याने सौम्य शॅम्पूने केस धुवा आणि नंतर हलका कंडिशनर वापरा.
केस होतील मऊ, सरळ आणि चमकदार सलूनसारखा लूक, तोही केमिकलशिवाय!