Sameer Amunekar
ऑईली स्किनसाठी फेसवॉश निवडताना "oil-free" किंवा "gel-based" फेसवॉश वापरा. दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुणे पुरेसे आहे. जास्त वेळा धुतल्यास त्वचा अधिक तेल तयार करते.
काकडी किंवा गुलाबपाण्याचा नैसर्गिक टोनर वापरा. टोनरमुळे पोर्स घट्ट होतात आणि अतिरिक्त तेलाचे प्रमाण कमी होते.
ऑईली स्किनसाठी सौम्य स्क्रब वापरा. स्क्रब केल्याने मृत पेशी दूर होतात आणि ब्लॅकहेड्स कमी होतात. लिंबू आणि मधाचा नैसर्गिक स्क्रबही उत्तम पर्याय आहे.
अनेकांना वाटते की ऑईली स्किनला मॉइश्चरायझरची गरज नाही, पण ते चुकीचे आहे. "Water-based" किंवा "non-comedogenic" मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा संतुलित राहते.
तळलेले, जास्त तेलकट आणि फास्टफूड कमी खा. त्याऐवजी फळे, भाज्या आणि पाणी यांचे प्रमाण वाढवा. योग्य आहारामुळे त्वचा आतूनही निरोगी दिसते.
आठवड्यातून एकदा चेहऱ्याला वाफ दिल्याने पोर्स स्वच्छ होतात आणि तेलकटपणा कमी होतो. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
झोपेची कमतरता आणि स्ट्रेसमुळे त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढते. दररोज किमान ७ तास झोप घ्या आणि ध्यान, योगाने मन शांत ठेवा.