Sameer Amunekar
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये केस गळतीची समस्या झपाट्याने वाढत आहे. चुकीच्या सवयी आणि अयोग्य आहारामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे.
मानसिक तणावामुळे टेलोजन एफ्लुवियम (Telogen Effluvium) नावाचा विकार होतो, ज्यामुळे केसांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होतो. मेडिटेशन, योगा आणि नियमित व्यायामाने स्ट्रेस कमी करू शकता.
शरीराला आवश्यक असणाऱ्या बायोटिन (Vitamin B7), व्हिटॅमिन D, प्रथिने, लोह (Iron), झिंक आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स यांच्या कमतरतेमुळे केस गळतात. जंक फूड आणि फास्ट फूडचे अधिक सेवन टाळा. हिरव्या पालेभाज्या, नट्स, दूध, अंडी, मासे आणि संत्री यांचा आहारात समावेश करा.
नियमित तेल लावणे टाळणे, केमिकल अलसलेल्या शॅम्पूचा जास्त वापर करणे, यामुळे केस कमजोर होतात. याचा परिणाम केसांवर होतो.
सूर्यप्रकाशातील UV किरणे, धूळ, प्रदूषण, आणि हवेतील हानिकारक घटक यामुळे केस कमजोर होतात. जास्त उन्हात फिरल्याने केस कोरडे पडतात आणि गळतात.
स्ट्रेटनिंग, करपिंग, हेअर ड्रायर आणि केमिकलयुक्त हेअर कलर्समुळे केस कमजोर होतात आणि तुटतात. केसांना नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करा.
झोप 7-8 तास झोप घेतली नाही तर शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे केस गळू लागतात. चांगल्या झोपेसाठी मोबाइल, लॅपटॉप आणि टीव्हीचा कमी वापर करा.