Hair Colour Tips: प्रोफेशनल टच हवाय? घरी हेअर कलर करताना 'या' चुका टाळा आणि दिसा स्टायलिश

Sameer Amunekar

पॅच टेस्ट स्किप करू नका

हेअर कलर लावण्याआधी 24 तास आधी पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. यामुळे अ‍ॅलर्जी, खाज किंवा जळजळ टाळता येते.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

केस धुवून लगेच कलर लावू नका

कलर करण्याच्या दिवशी केस धुतलेले असतील तर टाळू जास्त संवेदनशील असते. 1–2 दिवस न धुतलेले केस असतील तर कलर चांगला सेट होतो.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

चुकीचा शेड निवडू नका

स्किन टोन आणि केसांच्या नैसर्गिक रंगानुसारच शेड निवडा. खूप हलका किंवा खूप गडद रंग केल्यास लूक आर्टिफिशियल दिसू शकतो.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

सेक्शन न करता कलर लावणं टाळा

केसांचे छोटे-छोटे सेक्शन करूनच कलर लावा. एकसारखा रंग यावा यासाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

दिलेल्या वेळेपेक्षा जास्त कलर ठेवू नका

जास्त वेळ कलर ठेवल्याने रंग चांगला येत नाही, उलट केस कोरडे आणि डॅमेज होतात. पॅकवर दिलेल्या वेळेचं काटेकोर पालन करा.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

ग्लोव्ह्ज वापरणं विसरू नका

हातावर डाग पडू नयेत आणि स्किन सेफ राहावी यासाठी नेहमी ग्लोव्ह्ज वापरा.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

कलरनंतर योग्य केअर न करणं टाळा

कलर केल्यानंतर सल्फेट-फ्री शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर मास्क वापरा. यामुळे रंग टिकतो आणि केस चमकदार दिसतात.

Hair Colour Tips | Dainik Gomantak

निसर्गप्रेमींसाठी कोकणातील आचरा समुद्रकिनारा आहे नंदनवन

Konkan Achara Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा