Sameer Amunekar
केस धुतल्यानंतर थोडे सुकू द्या. पूर्ण ओले असताना विंचरल्यास केस तुटण्याची शक्यता जास्त असते.
घट्ट दातांचा कंगवा केस ओढतो. नेहमी wide tooth comb वापरा, त्यामुळे केस कमी तुटतात.
सुरुवात थेट मुळांपासून न करता आधी टोकांपासून करा आणि हळूहळू वर जा. गुंता कमी होतो.
प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर लावा. त्यामुळे केस मऊ होतात आणि विंचरताना तुटत नाहीत.
केस पुसताना टॉवेलने घासू नका. हलक्या हाताने पाणी शोषून घ्या किंवा सूती कपडा वापरा.
नारळ तेल, एरंडेल तेल किंवा बदाम तेलाने मुळांना मसाज करा. रक्ताभिसरण वाढून केस मजबूत होतात.
केसांची मुळे मजबूत ठेवण्यासाठी आहारात डाळी, अंडी, दही, सुकामेवा यांचा समावेश करा.