Sameer Amunekar
केस मोकळे ठेवून झोपल्यास ते उशाशी घासतात, ज्यामुळे तुटणे आणि फाटणे वाढते. विशेषतः लांब केसांसाठी ही समस्या जास्त असते.
झोपण्यापूर्वी हलक्या सैल वेणीत केस बांधल्यास ते गुंता होत नाहीत आणि तुटण्याचा धोका कमी होतो. घट्ट बांधू नका, कारण त्यामुळे टाळूवर ताण येतो.
कापसाच्या उशीवर केस जास्त घासतात. सॅटिन किंवा सिल्क उशीमुळे घर्षण कमी होते आणि केस मऊ राहतात.
थोड्या प्रमाणात हेअर सीरम किंवा तेलाने मसाज केल्याने केस ओलसर राहतात आणि तुटत नाहीत.
ओले केस बांधल्याने बुरशी, कोंडा आणि टाळूच्या समस्या निर्माण होऊ शकतात. केस पूर्णपणे वाळवून मगच झोपा.
घट्ट बन बांधून झोपल्यास मानेवर आणि केसांच्या मुळांवर ताण येतो. यामुळे सकाळी डोकेदुखी किंवा केसगळती होऊ शकते.
झोपताना केस हलक्या वेणीत बांधणे, योग्य उशीचा वापर आणि नियमित काळजी घेतल्यास केस निरोगी आणि चमकदार राहतात.