Sameer Amunekar
पिकलेल्या केळीत असलेले नैसर्गिक तेल आणि कार्बोहायड्रेट्स केसांना मऊ, चमकदार आणि रेशमी बनवतात.
केळीत असलेले व्हिटॅमिन B6 आणि बायोटिन केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत पोषण देऊन तुटणे कमी करतात.
सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि केमिकलमुळे झालेले नुकसान केळीतील अँटीऑक्सिडंट्स भरून काढतात.
कोरडे व कुरळे केस मऊ करण्यासाठी केळी आणि मधाचा हेअर पॅक अतिशय प्रभावी ठरतो.
केळीतील पोटॅशियम स्कॅल्पला मॉइश्चर देते आणि कोंडा कमी करण्यात मदत करते.
नियमित केळी पॅक वापरल्यास केसांच्या वाढीला चालना मिळते आणि नैसर्गिक घनता वाढते.
एक पिकलेले केळे, एक चमचा मध आणि एक चमचा दही एकत्र करून पेस्ट तयार करा, केसांवर 30 मिनिटे ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.