Sameer Amunekar
आठवड्यातून किमान २ वेळा नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि केस मजबूत होतात.
जास्तीचे हेअर स्प्रे, जेल, स्ट्रेटनर किंवा केमिकल ट्रीटमेंट केसांना कमकुवत करतात. शक्यतो नैसर्गिक पद्धती वापरा.
प्रोटीन, लोह, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स युक्त आहार घेतल्यास केसांची वाढ जलद होते.
आपल्या केसांच्या प्रकारानुसार सौम्य शॅम्पू व नैसर्गिक कंडिशनर (उदा. कोरफड, दही, मेथी पाणी) वापरा.Hair Care Tips
गरम पाणी, ड्रायर किंवा स्ट्रेटनरचा जास्त वापर टाळल्यास केस कोरडे आणि तुटके होण्यापासून वाचतात.
आठवड्यातून २–३ वेळा केस धुवावेत. धूळ, प्रदूषण आणि घामामुळे केसांच्या मुळांना इन्फेक्शन होऊ शकते.
स्ट्रेसमुळे केस गळणे, अकाली पांढरे होणे यासारख्या समस्या वाढतात. योगा, ध्यान आणि पुरेशी झोप केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.