Sameer Amunekar
कोरफडीचा जेल टाळूवर लावल्याने कोंडा कमी होतो आणि केसांची वाढ वेगाने होते.
आठवड्यातून किमान २ वेळा नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने हलक्या हाताने मसाज करा. रक्ताभिसरण सुधारून केस गळती थांबते.
दही, मेथी, कांद्याचा रस किंवा आंब्याच्या कोयीचा गर वापरून मास्क बनवा. त्यामुळे केसांना प्रोटीन मिळते.
वारंवार स्ट्रेटनिंग, कलरिंग किंवा हार्ड शॅम्पू वापरल्याने केस कमकुवत होतात. शक्यतो नैसर्गिक उत्पादने वापरा.
केस निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, डाळी, दूध, अंडी व भरपूर पाणी घ्या.
ताणतणावामुळेही केस गळतात. दररोज १५ मिनिटे योगासन किंवा ध्यान केल्याने केसांवर चांगला परिणाम होतो.
आठवड्यातून २-३ वेळा सौम्य शॅम्पू व कंडिशनरने केस धुवा. टाळू स्वच्छ राहिल्याने कोंडा होत नाही.