Sameer Amunekar
तज्ञांच्या मते आठवड्यातून 2 वेळा म्हणजेच महिन्यात साधारण 8 वेळा तेल लावल्याने केसांना पुरेसा पोषण मिळतो.
दररोज तेल लावल्याने स्कॅल्पवरील रोमछिद्र बंद होतात आणि केस गळण्याची शक्यता वाढते.
तेल केसांमध्ये नीट मुरण्यासाठी किमान 6-8 तास आवश्यक असतात. म्हणून झोपण्यापूर्वी लावणं उत्तम.
बाहेर जाताना तेल लावलेले केस धूळ व प्रदूषण खेचतात, त्यामुळे केस चिकट व कमजोर होतात.
आपल्या केसांच्या प्रकारानुसार नारळ, बदाम, भृंगराज किंवा आर्गन तेल वापरा. कोरड्या केसांसाठी बदाम, तर तेलकट केसांसाठी हलकं तेल योग्य.
तेल लावताना सौम्य मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि केसांची मुळे मजबूत होतात.
महिन्यात किमान 6–8 वेळा नियमितपणे तेल लावल्यास केसांना नैसर्गिक चमक, वाढ आणि मजबुती मिळते.