Sameer Amunekar
पावसात केस वारंवार भिजल्याने टाळूवर बुरशी आणि घाण साचू शकते. सौम्य शॅम्पूने केस धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा.
अंडी, डाळी, दूध, पनीर आणि सुकामेवा यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ केसांच्या मुळांना बळकटी देतात.
खोबरेल, बदाम किंवा भृंगराज तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत होतात.
ओले केस बांधल्याने केस तुटण्याची शक्यता वाढते. केस नैसर्गिकरित्या किंवा थंड हवेने सुकू द्या.
शरीर हायड्रेट ठेवल्याने आणि 7–8 तासांची झोप घेतल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
मान्सूनमध्ये स्ट्रेटनर, कर्लर किंवा जास्त केमिकलयुक्त उत्पादने वापरणे कमी करा. त्यामुळे केस कमकुवत होण्यापासून बचाव होतो.
जास्त ताणामुळेही केसगळती वाढू शकते. योग, ध्यान किंवा नियमित व्यायाम केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.