Hair Care Tips: लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी सोपे घरगुती उपाय: 1 महिन्यातच दिसेल फरक

Sameer Amunekar

नारळाच्या तेलाने मसाज

आठवड्यातून किमान २ वेळा कोमट नारळाचे तेल टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

मेथी दाण्यांचा वापर

रात्री मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी वाटून पेस्ट तयार करा आणि केसांवर लावा. ३० मिनिटांनी धुवा. केस गळणे कमी होईल आणि दाट होतील.

Hair Care Tips | Dainik Gomantak

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस किंवा पावडर केसांवर लावल्याने केस मजबूत होतात. पाण्यात मिसळून केस धुवल्यास केस चमकदार व दाट होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

अंड्याचा हेअर मास्क

एक अंडं, एक चमचा दही आणि थोडं ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पेस्ट बनवा. केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. २०-२५ मिनिटांनी धुवून टाका.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांच्या मुळांवर लावल्याने केसांची वाढ जलद होते. आठवड्यातून दोनदा लावा आणि ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कोरफड जेल

ताजं कोरफड जेल केसांवर व टाळूवर लावल्यास केस मऊ, चमकदार आणि तुटण्यापासून वाचतात. तसेच केस वाढीसही मदत होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

संतुलित आहार व पाणी

पुरेसं पाणी प्या, आहारात प्रथिने, हिरव्या भाज्या, सुका मेवा, दूध, डाळी यांचा समावेश करा. केस आपोआप मजबूत, लांब व दाट होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

मुरुमांना करा 'टाटा', आलं तुमची त्वचा करेल स्वच्छ आणि चमकदार

Hair Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा