Sameer Amunekar
पावसाचं पाणी आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे केस ड्राय, फ्रिझी आणि निस्तेज दिसू लागतात.
पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने केस धुवा. यामुळे धूळ, प्रदूषण आणि पावसाच्या पाण्यातील अशुद्धी दूर होण्यास मदत होते.
आठवड्यात 2-3 वेळा सौम्य शॅम्पू वापरा आणि प्रत्येक वेळी कंडिशनर लावून केसांचा ओलावा टिकवून ठेवा.
नारळ, बदाम किंवा आर्गन ऑइलने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि ड्रायनेस कमी होतो.
ओले केस बांधल्याने तुटणे, गळणे आणि स्काल्पमध्ये बुरशी वाढण्याचा धोका वाढतो. केस पूर्ण कोरडे झाल्यावरच बांधा.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वारंवार वापर टाळा. नैसर्गिकरित्या केस सुकू द्या किंवा थंड हवेवर ड्रायर वापरा.
प्रथिने, बायोटिन, ओमेगा-3 आणि व्हिटॅमिनयुक्त आहार घ्या. पुरेसे पाणी पिल्याने केस आतूनही निरोगी आणि मऊ राहण्यास मदत होते.