Sameer Amunekar
आजकाल ताण, चुकीची जीवनशैली आणि प्रदूषणामुळे तरुणांमध्ये केस गळणे व टक्कल पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
अंडी, कडधान्ये, दूध, सुकामेवा आणि हिरव्या भाज्या आहारात समाविष्ट करा. केस मजबूत राहण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत.
दररोज 7-8 तासांची शांत झोप घेतल्यास शरीरासोबत केसांच्या मुळांनाही योग्य पोषण मिळते.
योग, ध्यान किंवा नियमित व्यायाम केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि केस गळतीचा धोका कमी होऊ शकतो.
वारंवार हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा जास्त उष्णतेची उपकरणे वापरल्यास केस कमकुवत होऊ शकतात.
आठवड्यातून 2-3 वेळा सौम्य शॅम्पूने केस धुवा आणि हलक्या हाताने तेलाची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते.
दिवसभर पुरेसे पाणी प्या. आयर्न, झिंक, बायोटिन आणि व्हिटॅमिन D यांसारख्या पोषक घटकांची कमतरता टाळल्यास केस निरोगी राहण्यास मदत होते.