Hair Care Tips: दह्यामध्ये 'या' गोष्टी मिसळून लावा; केस होतील मुळापासून मजबूत, मऊ आणि रेशमी

Sameer Amunekar

दह्यासोबत मध

कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी २ चमचे दह्यात १ चमचा मध मिसळून लावा. यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो आणि केस मऊ होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि लिंबाचा रस

जर तुम्हाला कोंड्याचा (Dandruff) त्रास असेल, तर दह्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा. हा पॅक लावल्याने टाळू (Scalp) स्वच्छ होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि अंड्याचा पांढरा भाग

केसांच्या वाढीसाठी आणि प्रोटीनच्या पुरवठ्यासाठी दह्यात अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. यामुळे केस मुळापासून मजबूत आणि दाट होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि कोरफड जेल

चमकदार आणि सिल्की केसांसाठी दह्यामध्ये ताजे कोरफड जेल (Aloe Vera) मिसळून हेअर मास्क तयार करा. यामुळे केसांचा गुंता सहज निघतो.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि मेथी दाणे

केस गळती रोखण्यासाठी मेथी दाण्यांची पूड रात्री दह्यात भिजत ठेवा आणि सकाळी केसांना लावा. यामुळे केस गळणे लगेच थांबेल.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि ऑलिव्ह ऑईल

दुभंगलेल्या केसांची (Split Ends) समस्या असेल, तर दह्यात थोडे ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेल मिसळून लावा. केस निरोगी राहतील.

Hair Care Tips | Dainik Gomantak

लावण्याची योग्य पद्धत

हा कोणताही हेअर पॅक केसांना लावून ३० मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आणि माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा प्रयोग नक्की करा!

Hair Care Tips | Dainik Gomantak

सेलिब्रिटींसारखी चमकदार त्वचा हवीये? आहारात समाविष्ट करा 'हे' 7 पदार्थ

Natural Skin Glow | Dainik Gomantak
येथे क्लिक करा