Sameer Amunekar
प्राचीन काळापासून केसांसाठी मेहेंदीचा वापर केला जातो. पण अलीकडे बाजारात मिळणाऱ्या रंगीत किंवा केमिकलयुक्त मेहेंदीमुळे केसांना लाभापेक्षा हानीच होण्याची शक्यता अधिक असते.
बाजारात मिळणाऱ्या रेड, ब्लॅक किंवा ऑरेंज मेहेंदीमध्ये PPD नावाचे रसायन असते, जे त्वचेला आणि केसांना नुकसान पोहोचवते. त्यामुळे नैसर्गिक हिना (pure henna) वापरणेच अधिक सुरक्षित.
काही लोक मेहेंदी अधिक काळ ठेवतात की रंग गडद यावा, पण यामुळे केस कोरडे, काठडे आणि रुक्ष होतात. २–३ तासांपेक्षा अधिक वेळ ठेवू नका.
वारंवार मेहेंदी लावल्याने केसातील नैसर्गिक तेल कमी होतो, ज्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात. महिन्यातून एकदाच पुरेसे आहे.
काहीजण मेहेंदीत लिंबाचा रस, चहा, कॉफी किंवा इतर काही रसायनं मिसळतात. चुकीच्या मिश्रणामुळे डोक्याची त्वचा सेंसिटिव्ह होऊ शकते. त्याऐवजी भिजवलेली भिंगराज पावडर, आवळा किंवा ब्राह्मीसारखे नैसर्गिक घटक वापरा.
मेहेंदी लावल्यानंतर लगेच शॅम्पू केल्याने केसांतील ओलसरता निघून जाते. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त पाण्याने धुवा, आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पू वापरा.