Haihaya Kingdom: हैहय राजघराण्याचा इतिहास काय?

Pramod Yadav

गोव्यातील शिलालेख

गोव्यात हैहय राजघराण्याची सत्ता होती अशी माहिती अलिकडे एका शिलालेखाच्या वाचनातून समोर आली आहे. काय आहे या राजघराण्यांचा इतिहास?

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

ययातीची दोन मुले

मराठी विश्वकोशाच्या माहितीनुसार, ययातीच्या ज्येष्ठ यदू या मुलाला कोष्ट आणि सहस्रजित अशी दोन मुले होती.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

सहस्रजीत - हैहय

कोष्टापासून झालेल्या वंशाला यादव आणि सहस्रजितापासून झालेल्या वंशाला हैहय अशी नावे रुढ झाली.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

हैहय वंश

यादवांचीच एक चांद्रवंशीय शाखा म्हणून हैहय वंश विस्तारला.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

राजधानी माहिष्मती

हैहयांच्या पहिल्या महिष्मत राजाने नर्मदेकाठी माहिष्मती येथे राजधानी स्थापन केली. त्यानंतर भद्रश्रेण्य राजा गादीवर आला.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

भद्रश्रेण्यचा विस्तार

भद्रश्रेण्य याने पौरवांचे राज्य जिंकले आणि पूर्वेकडे काशीपर्यंतचा प्रदेश पादाक्रांत करून बनारस हस्तगत केले.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

भार्गव - हैहय संघर्ष

पुढे परशुरामाचा भृगुवंश (भार्गव) आणि हैहय यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

अर्जुनाच्या मुलाचा खून

या संघर्षात परशुरामाने हैहयांचा राजा कार्तवीर्याच्या अर्जुन या मुलाला ठार मारले. त्यानंतर अर्जुनाच्या मुलांनी भार्गवांचा राजा जमदग्नीचा खून केला.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

अर्जुन सर्वश्रेष्ठ राजा

कार्तवीर्याचा मुलगा अर्जुन हा हैहयांचा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून ओळखला जातो. त्यानेन सम्राट व चक्रवर्तीन ही बिरुदे धारण केली. त्यानेच हैहयांची सत्ता पूर्वे आणि उत्तरेला विस्तारली.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak

हैहयांची वंशावळ

मराठी विश्वकोशानुसार, भद्रश्रेण्य - दुर्दम - कनक - कार्तवीर्य - अर्जुनकार्तविर्य - जयध्वज - तालजंघ - वीटिहोत्र - अनंत - दुर्दय - सुप्रतीक अशी हैहयांची वंशावळ सांगितली जाते.

Haihaya Kingdom | Dainik Gomantak
Amboli Waterfall | Dainik Gomantak